रत्नागिरी : केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या भारत बंदला महाराष्ट्रातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पहायला मिळत आहे. या आंदोलनाला शिवसेनेसह महाविकास आघाडीने ठाम पाठिंबा दर्शविला आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ते रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शेती हा काही शिवसेनेचा विषय नाही. सेनेला तेवढी अक्कलही नाही. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठीच शिवसेनेनं या विषयाची काही जाण नसूनही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला., असं म्हणत निलेश राणेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, राज्यात ‘भारत बंद’ आंदोलनाचा प्रभाव कुठेही दिसत नाही. शेती हा शिवसेनेचा विषय कधीही असू शकत नाही. शिवसेना केवळ विरोधाला विरोध करत आहे, असं म्हणत निलेश राणेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
महत्वाची बातमी!”मुंबईत दुपारनंतर दुधाच्या गाड्या येणार नाहीत; दूध खरेदीसाठी नागरिकांची गर्दी”
‘भारत बंद’ ला राज्यभरात प्रतिसाद, बुलढाण्यात रेल्वे अडवली
आर्चीच्या ‘या’ नव्या लूकनं पाडलीय भुरळ; पहातच राहाल