भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सनी पराभव केला.
भारताने या सामन्यात टाॅस जिंकून प्रथम क्षेत्रceरक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावत 194 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मैथ्यू वेडने 32 चेंडूत 58 धावा तर स्टीव्ह स्मिथने 38 चेंडूत 46 धावा केल्या. भारताकडून टी.नटराजनने 2 तर शार्दूल ठाकूर व युझवेंद्र चहलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करताना भारताने हे लक्ष्य 19.4 षटकात 4 गडी गमावत पूर्ण केले. भारताकडून शिखर धवनने 36 चेंडूत 52 धावा, कर्णधार विराट कोहलीने 24 चेंडूत 40 धावा तर हार्दिक पांड्याने 22 चेंडूत 42 धावांची नाबाद विस्फोटक खेळी केली. भारताला शेवटच्या षटकात विजयासाठी 14 धावांची गरज होती. मात्र कुंफू पांड्याने केवळ 4 चेंडूत 14 धावा ठोकत भारताला विजय मिळवून दिला.
महत्वाच्या घडामोडी-
मैथ्यू वेड-स्टीव्ह स्मिथची आक्रमक खेळी; ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 195 धावांचे लक्ष्य
केंद्राने केलेला कृषी कायदा रद्द होणार नाही; चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना उत्तर
रंगभूमीची सेवा करणारा सच्चा कलाकार आज गेला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून भावनिक प्रतिक्रिया
दुसरा टी-20 सामना : भारताने टाॅस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय