मुंबई : खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यास जतन आणि संवर्धनासाठी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. ही विनंती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पाऊलखुणा संपूर्ण देशभरात पसरलेल्या आहेत. त्यांचं जतन, संवर्धन, आणि प्रसार करण्याची संपूर्ण जबाबदारी आपली आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने जाणिवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असं संभाजीराजे म्हणाले
जिंजी किल्ल्याला भेट दिल्यानंतर मा. मुख्यमंत्री यांच्याशी याविषयी फोनवर सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जिंजी किल्ल्यावरील राजसदरेच्या संवर्धनासाठी याठिकाणी मराठा हिस्ट्री गँलरी उभारणीसाठी तात्काळ 50 लाख रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले आहे, असं म्हणत संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
लाज नावाची गोष्ट शिल्लक राहिलीये का पाहा; निलेश राणेंची अजित पवारांवर टीका
मुंबई महानगरपालिकेवर देखील भाजपचा झेंडा फडकवणार- राम कदम
“इतरांना इकडेतिकडे पाठवण्याची भाषा करणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर त्यांचाच डाव उलटला”
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत लोकांनी भाजपचा माज उतरवला- हसन मुश्रीफ