मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. याबद्दल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत मतदारांचे आभार मानले.
विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला.आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल मतदारांचे मनापासून आभार.हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती आहे., असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
या यशासाठी अहोरात्र कष्ट करणारे कार्यकर्ते,मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जयंत पाटील जी,काँग्रेसचे नेते मा. बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी कष्ट घेतले. सर्वांच्या सुनियोजित अशा संघटीत प्रयत्नांतून हा विजय साकारला आहे., असं ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी सर्वांचे आभार मानले.
विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला.आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल मतदारांचे मनापासून आभार.हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती आहे.
— Supriya Sule (@supriya_sule) December 4, 2020
महत्वाच्या घडामोडी-
‘ते’ मुख्यमंत्र्याचे काैतुक आहे की अब्रू काढणे हे फक्त अजित पवारच सांगू शकतात- अतुल भातखळकर
भाजपने आता तरी जनतेला गृहीत धरणे सोडावे- विजय वडेट्टीवार
चंद्रकांतदादांनी माझा विजय सोपा केला- अरुण लाड
पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी; भाजपचा पराभव