Home महाराष्ट्र “MDH मसालेचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन”

“MDH मसालेचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन”

नवी दिल्ली : महाशय दी हट्टी (MDH) चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचंनि आज पहाटे 5 वाजून 28 मिनिटांनी निधन झालं. ते 98 वर्षांचे होते.

महाशय दी हट्टी यांना कोरोनाची लागण झाली होती, पण ते त्यातून बरे झाले होते. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांचं निधन झालं.

एमडीएच’ची वार्षिक उलाढाल 1500 कोटींच्या घरात आहे. त्यांच्या कंपनीचे 15 कारखाने असून, 1000 डिलर्सचं जाळं विस्तारलेलं आहे.

दरम्यान, महाशय धर्मपाल गुलाटी यांना 2019 मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार धर्मपाल गुलाटी यांना देण्यात आला होता. महाशय धर्मपाल गुलाटी MDH चे मालक होते.

महत्वाच्या घडामोडी-

…त्यामुळे आता ठाकरे सरकारला हिंदू शब्दाचेही वावडे वाटू लागले आहे- अतुल भातखळकर

बॉलिवूड यूपीला नेण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही- रामदास आठवले

“बॉलिवूडवाले मुंबईसारखी स्वप्ननगरी सोडून यूपीत जाऊन काय डाकू बनणार का?”

बॉलिवूड मुंबईबाहेर नेणं हे खिशातलं पाकीट मारण्याइतकं सोपं आहे का?- योगी आदित्यनाथ