Home महाराष्ट्र नारायण राणेंच्या संपत्तीची ईडीने चौकशी करावी; विनायक राऊत यांची मागणी

नारायण राणेंच्या संपत्तीची ईडीने चौकशी करावी; विनायक राऊत यांची मागणी

रत्नागिरी : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप खासदार नारायण राणे यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी विनायक राऊत यांनी केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना विनायक राऊत यांनी ही मागणी केली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही भाजपच्या शंभर नेत्यांची नावं ईडीला चौकशीसाठी देऊ शकतो, असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे.

नारायण राणे यांच्या संपत्तीची ईडीने चौकशी करावी, राणे सत्तेसाठी हपापले आहेत. त्यांनी मिटक्या मारत बसावे. त्यांना संपूर्ण आयुष्यात सत्तेतील सहभाग मिळणार नाही, असा टोलाही विनायक राऊत यांनी यावेळी लगावला.

भाजप सत्तेसाठी हपापली आहे. त्यामुळे भाजप सैरभर झाली आहे. म्हणूनच भाजप नेते ठिकठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आघाडी सरकारवर निशाणा साधत आहेत. आज ना उद्या आपण सत्तेच्या खुर्चीत जाऊन बसू असं भाजपला वाटत होतं. पण सुदैवाने तसं घडलं नाही, असं विनायक राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

कितीही ट्रोल करा, मी मराठी मुलगी आहे, मागे हटणार नाही- उर्मिला मातोंडकर

ज्यांना सिंधुदुर्गाचं नेतृत्व करता आलं नाही ते आता उद्धव ठाकरेंसारख्या संयमी नेतृत्वावर टीका करतायत- दिपक केसरकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सांभाळला, कोरोना काळात ते कुटुंबप्रमुख बनले- उर्मिला मातोंडकर

“सांगलीतील भिलवडीमध्ये मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार”