इस्लामाबाद : भारताशी युद्ध करण्यासाठी आमचं सैन्य तयार आहे, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे.
जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्र शासित प्रदेश निर्माण करण्यात आले. यामुळे पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला असून, आता भारत पाकव्याप्त काश्मीर संदर्भात कारवाई करेल, अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे.
भारतात सध्या नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनं सुरू आहेत, देशांतर्गत मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी भारत पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला करू शकतो, असा दावा इम्रान खान यांनी केला आहे.
दरम्यान, पंजाब प्रांतातील पिंड दादन खान येथे तहरीक-ए-इंसाफ पाकिस्तान या पक्षांतर्गत कार्यक्रमात इम्रान खान बोलत होते. यावेळी संबोधित करताना नागरिकत्व कायद्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
-भाजपच्या ‘या’ नेत्याने घेतली राज ठाकरेंची भेट; भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण
-दिल्लीत बसलेला तो शेंबडा मुलगा गतीमंद आहे- शरद पोंक्षे
-प्रकाश आंबेकडर यांना मुंबई पोलिसांची नोटीस
-राजकारणात कोणही विश्वास ठेवण्या योग्य राहिलं नाही, राजकारणाचं नुसतं भजं झालंय- मकरंद अनासपूरे