Home महाराष्ट्र अमृता फडणवीस यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत देवेंद्र फडणवीसांनी सोडलं माैन; म्हणाले…

अमृता फडणवीस यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत देवेंद्र फडणवीसांनी सोडलं माैन; म्हणाले…

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महिलांच्या सशक्तीकरणाबाबत गायलेलं ‘तिला जगू द्या’ गाणं रिलीज झालं. हे गाणं रिलीज झाल्यानंतर अमृता फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत अखेर मौन सोडलं.

जर आमच्या किंवा आमच्या कुटुंबीयांच्या वाट्याला कोणी गेलं तर त्यांनाही कुटुंब आहेत, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं होतं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपकडून ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त कारभाराची पोलखोल करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत होते.

घरच्यांच्या संदर्भात जो काही विषय मांडला जात आहे, त्याबद्दल बोलायचं तर आम्ही कोणाच्याही घरच्यांवर हल्ला करत नाही. आम्ही कोणाच्याही घरच्यांवर टीका केली नाही. आम्ही संयम बाळगतो. जर घरच्यांवरील टीकेबाबत बोलायचं झालं तर त्याचं सर्वात मोठं उदाहरण मी स्वत: आहे., असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, माझ्या पत्नीच्या संदर्भात शिवसेनेचे अधिकृत नेते काय बोलतात, काय लिहितात, ट्विटरवर काय टाकतात हे साऱ्यांना माहिती आहे. पण मी त्याचा कांगावा करत नाही, असं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शरद पवारांना नोटीस आली अन् चित्रं बदललं, आता शिवसेनेलाही नोटीस आलीय, ईडीचा पायगुण चांगला, येऊ द्या नोटीसा”

“कोल्हापूरची भूमी सोडून पुण्याला गेलेल्या चंद्रकांत पाटलांनी बारा वर्ष पाट्या टाकल्या”

“वर्षभरातील सरकारची कामगिरी शोभणारी नाही, जनता ठाकरे सरकारला नापास ठरवेल”

“बिग बॉस मराठी फेम हिना पांचाळचा बोल्ड लूक व्हायरल”