“ठाण्यात मनसेचं खळखट्याक, कशेळी टोल नाक्याची केली तोडफोड; पहा व्हिडिओ”

0
764

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबईतील कशेली टोल नाक्याची आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तोडफोड करण्यात आली. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

मनसेचे ठाणे जिल्हा सचिव संजय पाटील यांच्या नेतृत्वात ही तोडफोड करण्यात आली. बॅट आणि लाकडी दांडक्याने टोल नाक्याच्या काचा फोडल्या आहेत. यादरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी संजय पाटील यांच्यासह दोघांना ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, भिवंडी- ठाणे रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असताना, तरीही कशेळी टोल नाक्यावर टोल वसुली करण्यात येते, या विरोधात मनसेने काही दिवसांपूर्वी आंदोलनही केले होते . तसेच जर वेळेवर या रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत तर टोल नाक्याची तोडफोड करण्यात येईल, असा इशाराही मनसेकडून देण्यात आला होता. मात्र मागणी मान्य न करण्यात आल्याने मनसेने आज सकाळी कशेळी टोल नाक्याची तोडफोड करत मोठा राडा केला.

महत्वाच्या घडामोडी –

किरीट सोमय्यांवर 150 कोटींचा दावा करणार- हसन मुश्रीफ

सोमय्यांवरील कारवाई गृहमंत्रालयाकडून, मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही- संजय राऊत

सोमय्यांवरील कारवाई गृहमंत्रालयाकडून, मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही- किरीट सोमय्या

राष्ट्रवादीचे गुंड सोमय्यांना धमक्या देतात, त्यांच्या केसाला धक्का लावाल तर…; सदाभाऊ खोतांचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here