नांदेड : विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी होत असलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होणार असून या निवडणुकीत महाविकास आघाडी जिंकल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जातील., असं वक्तव्य राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केलं आहे. ते नांदेड येथे आयोजित मेळाव्यात बोलत होते.
दरम्यान, यावेळची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आणि वेगळी आहे. पहिल्यांदाच पंजा, घड्याळ आणि धनुष्यबाण एकत्र आल्याने ही निवडणूक अनोखी ठरणार आहे. शिवाय आपले सरकार आल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे. आता तिन्ही पक्ष एकत्र आल्याने आपणच जिंकणार आहोत, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
अभिनेत्री स्मिता गोंदकर कोकणच्या किनारी, सोेशल मिडियावर फोटोंचा धुमाकूळ
ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी, आता जमत नाही म्हणा आणि सोडून द्या- चंद्रकांत पाटील
वेश्या व्यवसायातील महिलांसाठी महाविकास आघाडी सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा
ईडीचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा