Home महाराष्ट्र प्रकाश आंबेकडर यांना मुंबई पोलिसांची नोटीस

प्रकाश आंबेकडर यांना मुंबई पोलिसांची नोटीस

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने आज 26 डिसेंबर रोजी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मोर्चाचं आयोजन केलं होतं. वंचित आघाडीच्या या आंदोलनाची परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली आहे.

मुंबई पोलिसांनी तशी नोटीस वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेकडर यांना दिली आहे.

प्रकाश आंबेकडर आज सीएएच्या विरोधात दादर मध्ये आंदोलन करणार होते. पण मुंबईत कुठल्याही मोर्चा किंवा आंदोलनाला पोलीस परवानगी नसल्याचे स्वतः पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, यावर आता प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या घडामोडी-

-राजकारणात कोणही विश्वास ठेवण्या योग्य राहिलं नाही, राजकारणाचं नुसतं भजं झालंय- मकरंद अनासपूरे

-संजय राऊत यांचा ट्वीटवरून भाजपवर निशाणा, म्हणातात…

…म्हणून आदित्य ठाकेर निवडणूक जिंकले, त्याला Z सुरक्षा कशाला- निलेश राणे

-ठाकरे सरकार अमृता फडणवीसांना धक्का देणार?