नवी दिल्ली : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि गांधी घराण्याचे विश्वासू, खासदार अहमद पटेल यांचं निधन झालंय. आज पहाटे 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही महिती त्यांचा मुलगा फैजल पटेल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन दिली. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसने ‘चाणक्य’ गमावला आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांची फार मोठी भूमिका होती, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अहमद पटेलांना श्रद्धांजली वाहिली आहे.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताना अहमद पटेल यांनी मार्गदर्शन केलं. त्यावेळी त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि अनुभवाचा आम्हाला खूप उपयोग झाला. त्यांच्या निधनाने महाविकास आघाडीने देखील आपला मार्गदर्शक गमावलाय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“उद्धव ठाकरेंचा ‘उठा’ आणि शरद पवारांचा ‘शपा’ असा उल्लेख झाला तर…;” चंद्रकांत पाटलांचा टोला
आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू- संजय राऊत
अहमद पटेल यांनीआयुष्यात अनेक वर्षे समाजसेवा केली; पंतप्रधान मोदींनी अर्पण केली श्रद्धांजली
काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन