अमरावती : लॉकडाऊनमध्ये आलेली वीजबिल यात सवलत देऊ असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले होते. मात्र, त्यांनी लोकांचा विश्वासघात केला, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव वीजबिल मुद्यावरुन राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ते अमरावती शिक्षक मतदरासंघातील भाजप उमेदवार नितीन धांडे यांच्या प्रचारासाठी आले होते, त्यावेळी माध्यमांशी बोलत होते.
हे सरकार घोषणा करते व त्यावर पलटते, लॉकडाऊनमध्ये वीज बिलात सवलत देऊ या घोषणा वारंवार सरकारने केल्या. तीन कॅबिनेट मंत्र्यांनी याची घोषणा केली होती. आता म्हणाले अभ्यास झाला नाही त्यामुळे हे सरकार लोकविरोधी आहे. असं फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सोबत घेणार का?, असं विचारले असता, भाजप स्वबळावर लढणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
नितीन राऊतांनी राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्कचं काम करावं- प्रविण दरेकर
“हिंदुत्वावर संकट ओढावलेले असताना मुख्यमंत्री स्वस्थ कसे बसू शकतात?; भाजप नेत्याचा सवाल
आमदार व्हायचा प्रयत्न करू नका नाहीतर…; मनसेच्या रूपाली पाटील ठोंबरेंना जीवे मारण्याची धमकी
धक्कादायक! मुंबईत अवघ्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर 2 अल्पवयीन मुलांकडून सामुहिक बलात्कार