Home महाराष्ट्र नितीन राऊतांनी राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्कचं काम करावं- प्रविण दरेकर

नितीन राऊतांनी राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्कचं काम करावं- प्रविण दरेकर

उस्मानाबाद : वाढीव वीज बिलाच्या मद्द्यावर सुरु  असलेले आरोप प्रत्यारोप थांबायचं नाव घेत नाहीत. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केलाय.

ऊर्जामंत्र्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्क म्हणून काम करावं, भाजप कार्यकर्ते त्यांना वीज बिलं दाखवतील’, असं म्हणत दरेकर यांनी नितीन राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.  आज पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रवीण दरेकर उस्मानाबादमध्ये  आले आहेत. याच पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते.

भाजप नेत्यांनी वीजबिलं घेऊन माझ्या कार्यालयात यावं, सर्वांची मी तपासणी करून देईन, जर वाढीव वीजबिलं नसतील, तर त्यांनी प्रॉमिस करावं, आम्ही सर्व वीजबिलं भरू, असं आव्हानच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल भाजपला दिलं होतं. त्यावर आज प्रवीण दरेकर यांनी राऊतांनावर पलटवार केला आहे.

ऊर्जामंत्र्यांनी 100 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे, त्यावरही दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे. आधी 100 युनिट मोफट देण्याची घोषणा केली, आता म्हणाले सवलतीमध्ये देऊ, हे वीज ग्राहकांच्या जखमेवर मिठ चोळणं आहे. हे सरकार जुलमी असून, राज्यात सध्या अस्थिरतेचं वातावरण असल्याचा घणाघात दरेकरांनी केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“हिंदुत्वावर संकट ओढावलेले असताना मुख्यमंत्री स्वस्थ कसे बसू शकतात?; भाजप नेत्याचा सवाल

आमदार व्हायचा प्रयत्न करू नका नाहीतर…; मनसेच्या रूपाली पाटील ठोंबरेंना जीवे मारण्याची धमकी

धक्कादायक! मुंबईत अवघ्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर 2 अल्पवयीन मुलांकडून सामुहिक बलात्कार

भाजपने ठरवलं तर महिला मुख्यमंत्री करायला वेळ लागणार नाही- चंद्रकांत पाटील