मुंबई : आम्ही हिंदुत्ववादी आहोत. आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. यावरुन भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
मुख्यमंत्री कोणत्याच परीक्षेला बसले नाहीत. पिंजऱ्यात बसून आहेत. त्यांनी कामच केलं नाही. मग सर्टिफिकेट कसं देणार?, असं म्हणत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी एकही काम केलं नाही. घरातच बसून असतात. पिंजऱ्यातून बाहेर पडत नाहीत. ठाकरे कोणत्याही परीक्षेला बसले नाहीत. बसत नाहीत. त्यामुळे त्यांना सर्टिफिकेट देण्याची गरज नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
पालघर हत्याकांडप्रकरण सीबीआयकडे सोपविण्याच्या मागणीसाठी भाजप नेते राम कदम यांनी जनआक्रोश रॅलीचं आयोजन केलं होतं. याप्रसंगी नारायण राणेही उपस्थित होते. यावेळी त्यांनी उद्घव ठाकरेंवर टीका केली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी काँग्रेसश्रेष्ठींनी साधं ट्विटही केलं नाही- नितेश राणे
भाजपनं राजकारणासाठी देवालाही सोडलं नाही- सचिन सावंत
“राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसेंना डोक्यावर चढवलंय”
…म्हणून महाराष्ट्रात परत एकदा फडणवीस सरकार पाहिजे- नितेश राणे