मुंबई : राहुल गांधी म्हणजे असा विद्यार्थी आहेत की, ज्याला शिक्षकांसमोर चांगली कामगिरी करुन दाखवायची असते. पण कुठेतरी त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता किंवा संबंधित विषयात प्रावीण्य मिळवण्याची पॅशन कमी पडते, असं बराक ओबामा यांनी म्हटलं होतं. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी परदेशी नेते भारतीय राजकीय नेत्यांविषयी अशी मतं व्यक्त करु शकत नाहीत., असं म्हटलं होतं. या सर्वांवर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊतांना टोला लगावला आहे.
शिवसेना हा एका राज्याचा जागतिक पक्ष नाराज झाल्यामुळे बराक ओबामाला झोप लागत नसेल. आता ओबामाचं कसं होणार या चिंतेमध्ये त्यांचा डेमोक्रॅट पक्ष युनायटेड नेशन्सकडे धाव घेण्याच्या विचारात असावा. ओबामाचं आता काही खरं नाही., असं ट्विट करत निलेश राणेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
शिवसेना हा एका राज्याचा जागतिक पक्ष नाराज झाल्यामुळे बराक ओबामाला झोप लागत नसेल. आता ओबामाचं कसं होणार या चिंतेमध्ये त्यांचा डेमोक्रॅट पक्ष युनायटेड नेशन्सकडे धाव घेण्याच्या विचारात असावा. ओबामाचं आता काही खरं नाही. https://t.co/JsXfujBLnP
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 15, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण”
रामाचं राज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला
कुंभकर्णी निद्रित असणारे अहंकारी महाराष्ट्र सरकार अखेर जागे झाले- राम कदम
भाजपने सरकारचे डोळे उघडले, म्हणूनच मंदिराचे दारं उघडले- नितेश राणे