Home पुणे “ठाकरे सरकार काही 4 वर्षे चालणार नाही, तसंच पुन्हा निवडणूक घेतल्यास भाजप...

“ठाकरे सरकार काही 4 वर्षे चालणार नाही, तसंच पुन्हा निवडणूक घेतल्यास भाजप निवडून येईल”

पुणे : ठाकरे सरकार काही 4 वर्षे चालणार नाही तसंच पुन्हा निवडणूक घेतल्यास भाजप निवडून येणार, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरताना चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

आम्ही चार वर्षे विरोधात बसण्याची तयारी केली आहे, मात्र हे सरकार काही चार वर्षे चालणार नाही, म्हणजे काय तर ते गुलदस्त्यात आहे, त्यावर भाष्य करायला मी भविष्यकार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच पुन्हा निवडणूक घेतली तर भाजप निवडून येईल, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बिहार निवडणुकीचा परिणाम आता यापुढच्या सर्व निवडणुकांवर होणार आहे. मी महाराष्ट्रात काम पाहतो, मी विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता असताना बिहारमध्ये गेलो होतो म्हणून नितीशकुमारांच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात मी मत मांडणं योग्य नाही, असंही चंद्रकांत पाटलांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी-

“सांगलीत तरूणाच्या डोक्यात दगड घालून खून”

ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार!; किरिट सोमय्या यांचा दावा

शिवसेनेनं आत्मचिंतन केलं पाहिजे; बिहार निवडणुकीवरुन देवेंद्र फडणवीसांचा टोला

मेरे हार की चर्चा होगी जरुर, मैंने जीत के बाजी हारी है; जयंत पाटलांकडून तेजस्वी यादव यांचं कौतुक