मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल तब्बल 18 तासांनी जाहीर झाला. या चुरशीच्या लढाईत अखेर भाजप-जेडीयूच्या एनडीएने 122 चा आकडा गाठत विजय मिळवला. तेजस्वी यादव यांनी सुरूवातीपासूनच आव्हान दिलं . यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं आहे.
बिहार निवडणुकीचे निकाल वेगळे लागले असले तरी तेजस्वी यादव यांची झुंज कौतुकास्पद आहे. सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे. तेजस्वी यादव यांच्याकडून युवकांनी प्रेरणा घ्यावी, असं जयंत पाटील म्हणले.
‘मेरे हार की चर्चा होगी जरूर मैंने जीत के बाजी हारी है ।’ , Well done अभिनंदन !असं म्हणत जयंत पाटील यांनी तेजस्वी यादव यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मेरे हार की चर्चा होगी जरूर
मैंने जीत के बाजी हारी है ।बिहारचे निकाल वेगळे लागले असले तरी तेजस्वी यादव यांची झुंज कौतुकास्पद आहे. सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे. युवकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी.
अभिनंदन ! Well done @yadavtejashwi pic.twitter.com/gYQw5JfXPH— Jayant Patil (@Jayant_R_Patil) November 11, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“नितीशकुमारांवर ही वेळ तेजस्वी यादव यांनी आणली”
“संजय राऊतांनी नगरपरिषदेत निवडून यावं, मग बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर बोलावं”
महाराष्ट्रातसुद्धा जनतेच्या घड्याळ्याच्या ‘टायमिंग’चं काय सांगावं- आशिष शेलार
“बिहारमध्ये नितीश कुमार यांचा घात झाला, भाजप मित्रपक्षांना संपवतो हे पुन्हा सिद्ध झालं”