पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल तब्बल 18 तासांनी जाहीर झाला. या चुरशीच्या लढाईत अखेर भाजप-जेडीयूच्या एनडीएने 122 चा आकडा गाठला. त्यामुळे बिहारमध्ये भाजप-जेडीयूच्या नेतृत्वातील एनडीए सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झालं आहे. बिहार निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत जनेतेचे आभार मानले.
लोकांच्या आशीर्वादामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा लोकशाहीचा विजय झाला. बिहारमधील भाजप कार्यकर्ते, त्यासोबतच घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी केलेले काम हे नक्कीच आश्चर्यचकित करणारे आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि बिहारमधील जनतेचे मनापासून आभार, असं मोदींनी म्हटलं.
एनडीएच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्रावर बिहारमधील शेतकरी, व्यापारी, दुकानदार, गरीब अशा प्रत्येक घटकाने विश्वास दाखवला. मी पुन्हा बिहारच्या प्रत्येक नागरिकाला आश्वासन देतो की, आम्ही प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक क्षेत्राच्या विकासासाठी नेहमी काम करत राहू,., असंही मोदी म्हणाले.
बिहारच्या महिलांनीही यावेळी रेकॉर्ड संख्येत मतदान केलं. त्यामुळे आत्मनिर्भर बिहारमध्ये त्यांची भूमिकाही महत्त्वाची आहे. बिहारमधील मातृशक्तीला नवीन आत्मविश्वास देण्याचा NDA ला संधी मिळाली, याचा मला आम्हाला अभिमान आहे. हा आत्मविश्वास आम्हाला बिहारमध्ये पुढे चालण्यास बळ देईल, असं नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे.
बिहार में जनता-जनार्दन के आशीर्वाद से लोकतंत्र ने एक बार फिर विजय प्राप्त की है।@BJP4Bihar के साथ एनडीए के सभी कार्यकर्ताओं ने जिस संकल्प-समर्पण भाव के साथ कार्य किया, वह अभिभूत करने वाला है। मैं कार्यकर्ताओं को बधाई देता हूं और बिहार की जनता के प्रति हृदय से आभार प्रकट करता हूं।
— Narendra Modi (@narendramodi) November 10, 2020
बिहार के गांव-गरीब, किसान-श्रमिक, व्यापारी-दुकानदार, हर वर्ग ने NDA के ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ के मूल मंत्र पर भरोसा जताया है। मैं बिहार के हर नागरिक को फिर आश्वस्त करता हूं कि हर व्यक्ति, हर क्षेत्र के संतुलित विकास के लिए हम पूरे समर्पण से निरंतर काम करते रहेंगे।
— Narendra Modi (@narendramodi) November 10, 2020
बिहार की बहनों-बेटियों ने इस बार रिकॉर्ड संख्या में वोटिंग कर दिखा दिया है कि आत्मनिर्भर बिहार में उनकी भूमिका कितनी बड़ी है। हमें संतोष है कि बीते वर्षों में बिहार की मातृशक्ति को नया आत्मविश्वास देने का NDA को अवसर मिला। यह आत्मविश्वास बिहार को आगे बढ़ाने में हमें शक्ति देगा।
— Narendra Modi (@narendramodi) November 10, 2020
महत्वाच्या घडामोडी-
मुंबई इंडियन्स पाचव्यांदा चॅम्पियन; फायनलमध्ये दिल्लीचा 5 विकेट्सने पराभव
“शिवसेनेनं काँग्रेसला सल्ला देण्याऐवजी स्वतःचं तोंड बंद ठेवावं”
देवेंद्र फडणवीसांमुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला- शरद पवार
संजय राऊतांचा गजनी झालाय ते पराभव विसरतात- निलेश राणे