बिहार : देशभरातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचा आज निकाल जाहीर होणार आहे. या निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. याच पार्श्वभूमीवर जेडीयूचे महासचिव केसी त्यागी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
बिहार विधानसभा निवडणुकीत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूला मोठा धक्का दिला आहे. जेडीयूनेही हा पराभव मान्य केला आहे. मात्र तेजस्वी यादवांमुळे नव्हे तर कोरोनामुळे आमचा पराभव झाला, असं वक्तव्य जेडीयूने केलं आहे.
दरम्यान, आम्हाला आमचा पराभव मान्य आहे. आम्हाला नैसर्गिक आपत्तीने पराभूत केलं आहे. नितीशकुमार नावाचा ब्रँड बिहारमधून गायब झालेला नाही आणि तेजस्वी यादवही नेते म्हणून इस्टॅब्लिश झालेले नाहीत. कोरोनामुळे लोकांची नकारात्मक मानसिकता तयार झाली. त्यामुळे आमचा पराभव झाला. राजदमुळे नाही, असं केसी त्यागी यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
नितीश कुमार आणि पंतप्रधान मोदी हेच बिहारच्या पराभवाचे वाटेकरी- धैर्यशील माने
“मला पूर्ण खात्री आहे की, बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू होईल”
नितीश कुमार की तेजस्वी यादव,कोण होणार मुख्यमंत्री?; बिहार निवडणुकीचा आज निकाल!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवातून काही शिकता आलं तर पहा; शिवसेनेचा भाजपला टोला