बिहार : देशभरातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचा आज निकाल जाहीर होणार आहे. या निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
बिहारमध्ये नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव आहे. या पराभवाचे वाटेकरी नितीश कुमार आणि मोदी असणार आहेत., असं म्हणत धैर्यशील माने यांनी भाजपला टोला लगावला आहे.
दरम्यान, सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरही धैर्यशील माने यांनी प्रतिक्रिया दिली. बिहार निवडणुकीमध्ये सुशांत सिंग राजपूत हा मुद्दाच नव्हता. परंतु, भाजपने हा मुद्दा बनवला. पण आता महाराष्ट्रातून बिहारमध्ये परिवर्तनची लाट गेली आहे. तेजस्वी यादव यांच्या रूपाने बिहारमध्ये परिवर्तन आलं. आता संपुर्ण देशात परिवर्तन येईल, असं धैर्यशील माने यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“मला पूर्ण खात्री आहे की, बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू होईल”
नितीश कुमार की तेजस्वी यादव,कोण होणार मुख्यमंत्री?; बिहार निवडणुकीचा आज निकाल!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवातून काही शिकता आलं तर पहा; शिवसेनेचा भाजपला टोला
“ड्रग्जप्रकरणी अभिनेता अर्जुन रामपालच्या घरावर एनसीबीची धाड”