Home जळगाव तीन तिघाडा अन् काम बिघाडा.. अशा पद्धतीने सरकार चाललंय; गिरीश महाजनांची महाविकास...

तीन तिघाडा अन् काम बिघाडा.. अशा पद्धतीने सरकार चाललंय; गिरीश महाजनांची महाविकास आघाडीवर टीका

जळगाव : मागील 3 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं असताना वेतन न मिळाल्याच्या विवंचनेतून एसटी कर्मचारी मनोज चौधरी यांनी आत्महत्या केली. यावरून भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

गिरीश महाजन यांनी चौधरी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, हे सरकार गेंड्याच्या कातडीचं असून त्यांना या सरकारला कोणत्याही प्रकारच्या संवेदना नाहीत. दिवाळीचा सण तोंडावर असताना सरकार 4 महिने लोकांना पगार देत नाहीत., असं म्हणत गिरीश महाजनांनी सरकारवर जोरदार हल्ला केला आहे.

दरम्यान, तीन तिघाडा अन् काम बिघाडा.. अशा पद्धतीने सरकार चाललंय. एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. परंतु सरकारला अजूनही जाग नाही. कुणीही या पीडित कुटुंबीयांना भेटायलाही तयार नाही. हे सरकार संवेदनाहीन झालंय, असंही म्हणत गिरीश महाजनांनी सरकारवर टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“अर्णब गोस्वामींना अंतरिम जामीन नाहीच, कोर्टाने अर्ज फेटाळला”

“भाजपचे जळगाव येथील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न”

“मुंबईत सर्वत्र फटाके फोडण्यास बंदी, महापालिकेनं केलं परिपत्रक जारी”

“अखेर भूषण प्रधानने व्यक्त केल्या भाग्यश्रीबद्दलच्या प्रेमभावना”