Home महाराष्ट्र त्यावेळी भाजप नेत्यांना ‘आणीबाणी’ आठवली नाही; अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपला...

त्यावेळी भाजप नेत्यांना ‘आणीबाणी’ आठवली नाही; अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपला टोला

मुंबई : रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ही कारवाई म्हणजे आणीबाणी आणि पत्रकारितेविरोधात आहे, असं म्हटलं होतं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारविरोधी लिहिणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करताना,द वायर, NDTV, द प्रिंट यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देताना भाजप नेत्यांना ‘आणीबाणी’ आठवत नाही.पण पत्रकारितेच्या नावाखाली विशिष्ट अजेंडा रेटणाऱ्या ‘अभिनेत्यावर’ कारवाई होताच त्यांना अचानक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवतं., असं ट्विट करत रोहित पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे.

पण याच ‘अभिनेत्या’मुळं एका सामान्य व्यक्तीने आपल्या आईसह आत्महत्या केल्याचा आरोप,’सोशल मीडिया हब’सारख्या यंत्रणेमार्फत लोकांवर नियंत्रण ठेवण्याचा मध्यंतरी केंद्राने केलेला प्रयत्न/पत्रकारांचा हक्क हिरावणारा कायदा करण्याचा केलेला प्रयत्न मात्र त्यांना दिसत नाही.हा कसला दुटप्पीपणा? असं म्हणत रोहित पवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अर्णव गोस्वामी हा भाजपचा प्रवक्ता, म्हणून भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत- संजय राऊत

नोव्हेंबर अखेरपर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरु होईल; विजय वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण

तुमच्या बाजूने बोललं तर ठीक, अन्यथा घरात घुसून खेचणार का?; अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर गिरीश महाजनांचा सरकारला सवाल

“स्वतःचा पक्ष एका वर्षात बरखास्त करण्याची वेळ ओढावलेल्या नारायण राणेंनी शिवसेनेला घरी बसवण्याची स्वप्न बघू नयेत”