Home महाराष्ट्र 2019 च्या निवडणुकीतून पळ काढणाऱ्या राणेंनी 2024 च्या निवडणूक रिंगणात उतरावं; शिवसेनंचं...

2019 च्या निवडणुकीतून पळ काढणाऱ्या राणेंनी 2024 च्या निवडणूक रिंगणात उतरावं; शिवसेनंचं राणेंना खुलं आव्हान

सिंधुदुर्ग : कोकणातील शिवसेनेच्या 11 आमदारांना घरी बसवून शिवसेनेला कोकणातून हद्दपार करण्याची घोषणा भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी केली होती. यावर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया देत राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

2019 च्या निवडणुकीतून पळ काढणाऱ्या नारायण राणेंनी येत्या 2024 च्या निवडणूक रिंगणात उतरावं. शिवसेना काय आहे तुम्हाला कळेलच, असं आव्हान वैभव नाईक यांनी नारायण राणे यांना दिलं आहे.

दरम्यान, नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे 11 आमदार निवडून येणार नाही, असं आव्हान केलं होतं. ते आव्हान शिवसेनेनं स्वीकारलं आणि 2014 ला राणेंचं आव्हान मोडूनही काढलं. विधानसभेतही त्यांचा पराभव शिवसैनिकांनीच केला. पण त्यानंतर त्यांचा मुलाचाही सलग 2 वेळा  पराभव शिवसेना आणि कोकणातील जनतेनंच केला, असं म्हणत वैभव नाईक यांनी राणेंना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

ठाकरे सरकारची ठोकशाही सुरु आहे; अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटलांची टीका

अर्णब गोस्वामी भाजपचे कार्यकर्ते आहेत? त्यांच्या अटकेवरून इतकी ओरड का?; शिवसेनेचा भाजपला सवाल

ठाकरे सरकारला याची किंमत मोजावी लागणार; अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया

जे राज्य सरकारच्या विरोधात बोलतात त्यांना अशाच प्रकारे अटक करण्यात येते- निलेश राणे