Home महाराष्ट्र ठाकरे सरकारची ठोकशाही सुरु आहे; अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटलांची टीका

ठाकरे सरकारची ठोकशाही सुरु आहे; अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटलांची टीका

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

अर्णब गोस्वामींना अटक केल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी या अटकेचा निषेध व्यक्त करत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. अर्णबच्या सुटकेपर्यंत आम्ही काळ्या पट्ट्या बांधू, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, ठाकरे सरकारची ठोकशाही सुरु आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घावा घालण्याचं काम ठाकरे सरकार करत असल्याचा आरोप करत हे प्रकरण 2 वर्षांपूर्वीचं आहे. ती फाईल देखील बंद झाली होती मात्र सरकार अर्णब यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी काहीतरी कारण शोधत होतं., असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अर्णब गोस्वामी भाजपचे कार्यकर्ते आहेत? त्यांच्या अटकेवरून इतकी ओरड का?; शिवसेनेचा भाजपला सवाल

ठाकरे सरकारला याची किंमत मोजावी लागणार; अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया

जे राज्य सरकारच्या विरोधात बोलतात त्यांना अशाच प्रकारे अटक करण्यात येते- निलेश राणे

बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा’; अर्णव गोस्वामी अटकेनंतर अमृता फडणवीसांचं ट्विट