Home महाराष्ट्र अर्णब गोस्वामी भाजपचे कार्यकर्ते आहेत? त्यांच्या अटकेवरून इतकी ओरड का?; शिवसेनेचा भाजपला...

अर्णब गोस्वामी भाजपचे कार्यकर्ते आहेत? त्यांच्या अटकेवरून इतकी ओरड का?; शिवसेनेचा भाजपला सवाल

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर भाजपने राज्य सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली. यावर शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया देत भाजपला टोला लगावला आहे.

या प्रकरणाचा पत्रकारीतेच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नाहीये. मग भाजप नेते त्यांच्या अटकेवरून इतकं का ओरडतायत? गोस्वामी भाजपचे कार्यकर्ते आहेत का?, असा सवालही अनिल परब यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, अर्णब गोस्वामींमुळे अन्वय नाईक यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. भाजप अशा गोस्वामींच्या बाजूने आहे का? जर असं असेल तर त्यांनी जाहीर करावं, असं म्हणत अनिल परब यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

ठाकरे सरकारला याची किंमत मोजावी लागणार; अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया

जे राज्य सरकारच्या विरोधात बोलतात त्यांना अशाच प्रकारे अटक करण्यात येते- निलेश राणे

बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा’; अर्णव गोस्वामी अटकेनंतर अमृता फडणवीसांचं ट्विट

हिसाब तो होगा, इंटरेस्ट लगा के; अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर नितेश राणेंचा ठाकरे सरकारला अप्रत्यक्ष टोला