मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हे 2018चं प्रकरण असताना गोस्वामी यांना आता अटक करण्यात येत आहे. पोलीस आतापर्यंत झोपले होते का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे
भारतातील नामवंत पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकावता येणार नाही म्हणून एका वास्तुविशारदाच्या आत्महत्या प्रकरणी अडकवण्यात येत आहे, असं म्हणत 2018 सालीच ही केस बंद झाली होती. ती केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आज घडली आहे. मी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि त्याहून आधी एक भारतातील नागरिक म्हणून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
…अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही; नवनीत राणांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा
अर्णब गोस्वामीवरील कारवाई पोलिसांकडून; राज्य सरकारचा यात काहीही संबंध नाही- संजय राऊत
“रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक”
डेव्हिड वाॅर्नर-वृद्धिमान साहाची नाबाद शतकी पार्टनरशिप; हैदराबादचा मुंबईवर 10 विकेट्सनी विजय