पुणे : कोल्हापुरात निवडून नाही आलो, तर हिमालयात जाईन, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. ते पुण्यात बोलत होते.
आयुष्यात सतत काम करीत राहा, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मी शिकलो. पक्ष आदेशामुळे मी पुण्यातून लढलो, अन्यथा आजही कोल्हापूरातून लढण्याची माझी तयारी आहे. तिथून आपण निवडून न आल्यास हिमालयात जाईन, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
दरम्यान, अनेकांनी मला पुण्यात पराभूत करण्याचा डाव आखला होता. रात्रभर बैठका सुरू होत्या. मला पराभूत करण्याचा प्रयत्न केला गेला. एकास एक लढत देत मला मतदार संघात ठेवण्यात ते यशस्वी झाले, मात्र मी निवडून आलो, असं यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
राज्यात दिवाळीनंतर मंदिरं सुरू होणार- राजेश टोपे
अजिंक्य रहाणे-शिखर धवनची शानदार अर्धशतके; दिल्लीची बेंगलोरवर 6 विकेट्सनी मात
देवा अशा मूर्खांपासून माझ्या कोकणाला वाचव; नितेश राणेंचा शिवसेनेला टोला
“एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा तिरस्कार कमी करावा”