भिवंडीत 3 मजली इमारत कोसळली, 8 जणांचा मृत्यू; अनेक जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले

0
132

मुंबई : मुंबईतील भिवंडी शहरात एक तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 20-25 लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एएनआयनं या संदर्भात ट्विट केलं आहे.

भिवंडी शहरातील धामणकर नाका पटेल कंपाऊंड या परिसरातील जिलानी इमारत कोसळली. पहाटे 3.40 च्या सुमारात ही दुर्घटना घडली. पहाटेच्या वेळी ही सर्व दुर्घटना घडल्याने अनेक नागरिक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या इमारतीत 25 कुटुंब वास्तव्यास होते.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर NDRF आणि अग्निशमन दलाकडून तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल

किंग्ज इलेव्हन पंजाब विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना टाय; सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा विजय

उद्धवजी, आतातरी जनतेची दिशाभूल करणं सोडा- चंद्रकांत पाटील

अनुराग कश्यपला अटक करा; कंगणा रणाैतची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here