आमचा मोहोळ तर तुमचा पार्थ “देवा” भाऊचा “सुफला शॉट” ?

0
204

पुणे- पुण्यातला भूखंडाचा श्रीखंङ किती महत्वाचा आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. ५ एक वर्षापुर्वी मुळशी पॅटर्न हा पिक्चर ही त्याच्यावर येऊन गेला. जमिनीतून पैसा व पैशातून पाॅवर हे पुण्याच्या राजकारणच सूत्र बनत आहे. त्यातून मग गँगवॉर, हाणामारी, खून हे पुण्यासाठी नित्याचेच झालय..

राजकारणही यातून सुटले नाही, भूखंडाच्या श्रीखंङाची वाटी आपल्या ताटात असावी यासाठी सगळेच धडपड करत असतात . आणि अशातच १५ दिवसापुर्वी देवाभाऊचे चाॅकलेट बाॅय असणारे मुरली मोहोळ यांचजैन बोर्ङीग प्रकरण बाहेर पङल..

दिसायला नेहमीप्रमाणेच भुखंङाच प्रकरण असल तरी ते उचलून धरल रविंद्र धंगकर यांनी ते शिंदेसेनेच
पण यामागे अदृष्य हात होते ते अजितदादांच्या लोकांचे कारण तर महाराष्ट्र आॅलिपिक ची निवङनूक होती व मुरलीधर मोहोळ हे अध्यक्ष पदासाठी दावा ठोकून होते तर इकङे आजित दादा ही पदासाठी आग्रही होते.

या निवडणूकीच्या मुहूर्तावर हे मोहोळांच प्रकरण बाहेर आल . व मोहोळ व भाजप ङॅमेज झाले शेवटी सेटलमेंट झाली व अजितदादा अध्यक्ष झाले तर मोहोळांची वरीष्ठ उपाध्यक्ष अशी बोळवन केली
या चालीत दादा जिंकले..

याचा वचपा तर निघणार होताच

२ दिवसांपुर्वी पार्थ याचं महार वतनातल्या जमिनीत प्रकरण बाहेर आल .. १८०० कोटीला नाममात्र ५०० रू स्टॅम्प भरून त्यांचा यात 99 % सहभागात आहे. हे सिध्द झाल. आता अशी परिस्थिती आहे यामुळे दादा बॅकफूटवर गेले व राजीनामा द्यायला लागतो की काय अशी परिस्थिती ओढावली आहे

पवार विरूद्ध पवार नाहीतर पवार विथ पवार अस काहीस चित्र काही दिवस महाराष्ट्र मधे होत दादांनी पवार कुटुंबांच्या कार्यक्रमास हजेरी लावन , काका पुतण्या गाटी- भेटी होण हे चालूच होत. भध्यतरी पवार साहेबानी भाजप सोङून कुणाबरोबरही जावा असा निरोप कार्यक्रमात दिला..

अशा वेळी देवाभाऊचा कोप होण साहजिकच होत एकतर मोहोळ प्रकरण , महाराष्ट्र आॅलिपिक निवङनूक यामुळ भाजपायी चिङून होतेच अशातच

पवार विथ पवार हे नविन समीकरण होत असताना देवाभाऊनी सुफला शाॅट देऊन अजित दादांना कात्रजचा घाट दाखवला अस म्हणायला हरकत नाही -. अशातच चंद्रकांत दादांनी २२ भुखंङ प्रकरणाचीही चौकशी होणार अस बोलून या पुणेरी भेळमिसळीवर कोल्हापूरी कट ओतला..

हा देवाभाऊचा सुफला शाॅटची गोळी आज दादांच्या कानाजवळून जात आहे पण पुढे ठाण्याच्या दाढीला ही लागू शकते याचा अंदाज भाजप मित्रपक्षास आलाच असेल.

कारण ही नुसती गोळी नाही तर २०२९ ची स्वबळावरची तयारी आहे.

ही बातमी पण वाचा – 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा संजय पाटील यांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here