Home महाराष्ट्र ठाकरे सरकार म्हणजे बोलीचा भात आणि बोलाची कडी… नुस्तं बोलबच्चन- निलेश राणे

ठाकरे सरकार म्हणजे बोलीचा भात आणि बोलाची कडी… नुस्तं बोलबच्चन- निलेश राणे

मुंबई : अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दहा हजार कोटीचं पॅकेजही जाहीर केलं होतं. मात्र, शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा दावा भाजप आमदार निलेश राणे यांनी केला असून त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

ठाकरे सरकार म्हणजे बोलीचा भात आणि बोलाची कडी… नुस्त बोलबच्चन. पंचनामे झाले आता पुढे काय?? आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्ज काढू सांगणारे ठाकरे सरकारचे मंत्री कुठे गेले?? प्रत्येक वेळेला केंद्राकडे बोट दाखवायचं असेल तर मंत्रालय पण दिल्लीला हलवा., असं ट्विट करत निलेश राणेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, अवकाळी पावसामध्ये शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. पण ती प्रत्यक्षात कधी मिळणार, याची आपदग्रस्त शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे., असं म्हणत निलेश राणेंनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.


महत्वाच्या घडामोडी-

…मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दुःख वेगळे आहे का?; विश्वजित कदम यांचा केंद्र सरकारला सवाल

Pub-G आजपासून पूर्णपणे बंद; मोबाईलमध्ये गेम चालणार नाही

अकरावी प्रवेश लवकरच; राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरू होणार- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

“उर्मिला मातोंडकरांबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील”