Home महाराष्ट्र अकरावी प्रवेश लवकरच; राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरू होणार- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

अकरावी प्रवेश लवकरच; राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरू होणार- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई :  राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरू करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

मराठा आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेमुळेे अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ लागत आहे, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेऊन विद्यार्थीहिताचा निर्णय घेऊ आणि अकरावीचे प्रवेश सुरू करू, असं आश्वासन यावेळी वर्षा गायकवाड यांनी दिलं आहे.

कोरोनाचा संसर्ग मंदावत असल्याचं दिसत असलं तरी राज्यातील शाळा दिवाळीनंतरच सुरू करण्याचा विचार करण्यात येईल. कारण विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा हे आमचे प्रमुख ध्येय आहे, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पहिल्यांदा नववी ते बारावी या इयत्तांचे वर्ग सुरु केले जातील, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. तसेच कोरोना संकटामुळे विद्यार्थी फी भरू शकला नाही आणि शाळेने या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले तर शाळांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“उर्मिला मातोंडकरांबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बैठकीनंतर कोंडी फुटली; राज्यात आजपासून कांदा लिलाव सुरु होणार

रवींद्र जडेजाची नाबाद मॅच विनिंग खेळी; चेन्नईचा कोलकातावर शेवटच्या चेंडूवर विजय

सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही सर्वच गुंडाळलं; राधाकृष्ण विखे पाटलांचं शिवसेनेवर टीकास्त्र