Home जळगाव “जेव्हा पोरं निकम्मी असतात, तेव्हा म्हाताऱ्या बापाला बाहेर फिरावं लागतं”

“जेव्हा पोरं निकम्मी असतात, तेव्हा म्हाताऱ्या बापाला बाहेर फिरावं लागतं”

बुलढाणा : अतिवृष्टी, कांदा प्रश्नावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दौरे करत आहेत. यावरून भाजपचे किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल बोंडे कृषी विधेयकाविषयी भाजपकडून सुरु असलेल्या जनजागृती मोहीमेसाठी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ते बोलत होते.

पवार साहेबांबद्दल कौतुक असले तरी पण म्हाताऱ्या बापाला का फिरावं लागतं?, जेव्हा पोरं निकम्मी असतात, तेव्हा म्हाताऱ्या बापाला बाहेर फिरावं लागतं, शरद पवारांच्या दौऱ्यांमुळे हे सरकार लायकीचे नसल्याचे स्पष्ट होते, असं म्हणत अनिल बोंडे यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, राज्याच्या सत्तेत असलेले महाविकास आघाडी सरकार पाडायचे आहे, हे भाजपने कधीच म्हटले नाही. मात्र, कपटीपणाने सत्तेवर आला आहात तर सरकार चालवून दाखवा. जनतेची कामे करा, जे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते ते पूर्ण करा, असं म्हणत अनिल बोंडेंनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अभिनेत्री माल्वी मल्होत्रावर चाकूहल्ला; मुंबई पोलिसांनी आरोपीला केलं अटक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कशाला भेटायचं, शरद पवारच सरकार चालवत आहेत; चंद्रकांत पाटलांचा सरकारला टोला

“गुजरातचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांचं निधन”

कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही; राज ठाकरेंचा राज्य सरकारला टोला