मुंबई : राज्यात प्रश्न खूप आहेत. प्रश्नांची कमतरता नाही. कमतरता आहे ती फक्त निर्णय घेण्याची असं म्हणत निर्णय का घेतले जात नाहीत? कशासाठी हे सरकार कुंथत आहे? कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकावर हल्लाबोल केला आहे. राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन 10 ते 15 मिनिटं चर्चा केली. राज्यपालांच्या भेटीनंतर राज यांनी माध्यमांशी संवाद साधून भेटीचं कारण उघड केलं.
लॉकडाऊननंतर राज्यातील नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल येत आहे. ही बिले कमी व्हावीत आणि नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून राज्यात ठिकठिकाणी मनसेने आंदोलने केली. अदानीसह अनेकजण भेटूनही गेले. एमईआरसीने मान्यता दिली तर आम्ही वीज बिल कमी करू असं ते म्हणाले. त्यांचे लेखीपत्रंही आमच्याकडे आहे, असं एमआरसीने म्हटलं आहे.
दरम्यान, यासंदर्भात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशीही बोलणं झालं. लवकरात लवकर निर्णय घेऊ असं ते म्हणाले. हा विषय आज राज्यपालांच्या कानावर टाकला. त्यावर त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांशी बोलण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आम्ही पवारांशी बोलून चर्चा करू. तसेच गरज पडल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटेन, असंही राज ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
जेवलीस का? मॅचदरम्यान विराट कोहलीचा अनुष्काला प्रश्न; सोशल मिडियावर व्हिडीओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत पत्र आणि राजसाहेबांना मराठीत माफीनामा; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला
सुर्यकुमार यादवची विस्फोटक फलंदाजी; मुंबई इंडियन्सचा राॅयल चैलेंजर्स बेंगलोरवर 5 विकेट्सनी विजय
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण