Home महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या राजकारणासाठी बाळासाहेबांच्या हिंदूत्वाला काळिमा फासला- आशिष शेलार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या राजकारणासाठी बाळासाहेबांच्या हिंदूत्वाला काळिमा फासला- आशिष शेलार

 मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या राजकारणासाठी बाळासाहेबांच्या हिंदूत्वाला काळिमा फासला असून हिंदूत्व खोटे ठरविले आहे, असं म्हणत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

घूमजाव किंवा यू टर्न म्हणजेच ‘उद्धव टर्न’ अशी आता व्याख्या झाली आहे. देव, देश आणि धर्म यासाठी शिवसेनेनं भाजपसोबत युती केली होती. मात्र, आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करून शिवसेनेनं मतदारांचा विश्वासघात केला आहे, असंही शेलार म्हणाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूत्वासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला होता. त्यासाठी त्यांनी मतदानाचा अधिकारही गमावला, मात्र  उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या हिंदूत्वाला काळिमा फासत आहेत, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी सोबत हात मिळवणी करत सत्ता स्थापन केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

-गेल्या दिड- दोन महिन्यात महाराष्ट्राने बिन पैशाचा तमाशा बघितला- राज ठाकरे

-राहुल द्रविडच्या मुलाने ठोकले द्विशतक

-बाळासाहेब हयात असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते- नारायण राणे

-नागरिकत्व कायद्याला जे लोक विरोध करत आहेत ते देशद्रोही- संभाजी भिडे