मुंबई : मंगळवारी राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शरद पवारांचं कौतुक केलं. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पंकजा मुंडेंवर स्तुतिसुमनं उधळली आहेत.
धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे, असं म्हणत रोहित पवारांनी पंकजा मुंडेंचं कौतुक केलं आहे.
अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा, असं रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, शरद पवार साहेब, hats off… करोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले… पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले, तरी कष्ट करणाऱ्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.
धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा. https://t.co/ug3f21o56g
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 28, 2020
महत्वाच्या घडामोडी-
तुला थोबडवनार आता आम्ही मराठी; मराठी भाषेची चीड येते म्हणणाऱ्या जानकुमार सानूला मनसेचा दणका
…तर यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला
…तर खंबीर मराठा समाज सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही; उदयनराजे भोसलेंचा सरकारला इशारा