Home महाराष्ट्र मराठा, ओबीसी, धनगर समाज सर्वांना न्याय देईन, मुख्यमंत्री म्हणून वचन- उद्धव ठाकरे

मराठा, ओबीसी, धनगर समाज सर्वांना न्याय देईन, मुख्यमंत्री म्हणून वचन- उद्धव ठाकरे

मुंबई : मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाष्य केलं.

मराठा, ओबीसी, धनगर समाज सर्वांना सांगतो, आम्ही तुमचे आहोत. हे सरकार तुमचं आहे. कोणत्याही समाजाला न्याय दिल्याशिवाय शांत राहणार नाही, हे मुख्यमंत्री म्हणून माझं तुम्हाला वचन आहे. सगळ्या समाजाला मी न्याय देईन. न्याय देताना कुणाचं काहीही काढून घेणार नाही., असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं.

फक्त एकच हात जोडून नम्र विनंती करतोय की, जातपात आणि समाजात जे कुणी महाराष्ट्रात द्वेशच्या भींती उभ्या करत असतील त्यांच्या कारस्थानांना बळी पडू नका. कारण तुम्ही म्हणजे महाराष्ट्र आहात. तुम्ही म्हणजे शिवरायांचे मर्द मावळे आहात. तुमच्यात फूट पडली, तोडफोड करणाऱ्यात जर ते यशस्वी झाले तर केवळ आपलेच नाही तर महाराष्ट्राचे तुकडे करायला ते मागेपुढे पाहणार नाहीत., असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, दसऱ्यानिमित्त महाराष्ट्राच्या एकजुटीला तडा जाईल, असं मी काही करणार नाही, अशी शपथ घेऊया., असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

ऋतुराज गायकवाड-अंबाती रायडूची शानदार फलंदाजी; चेन्नईचा राॅयल चैलेंजर्स बेंगलोरवर 8 विकेट्सनी विजय

“मुख्यमंत्र्यांना बाहेर पडा म्हणणाऱ्या फडणवीसांना आता परिस्थिती किती गंभीर आहे, हे कळलं असेल”

राज्य सरकारकडून कोकणातील शेतकऱ्यांची थट्टा, कोकणासाठी विशेष पॅकेज जाहीर करा- प्रविण दरेकर

ख्रिस जाॅर्डन-अर्शदिप सिंगची शानदार बाॅलिंग; पंजाबचा हैदराबादवर रोमांचक विजय