नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना 2011 मध्ये एका माथेफिरू तरुणाने गर्दीतून पुढे येत हल्ला केला होता. या तरुणाला आठ वर्षांनी दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. अरविंदर सिंग असं या तरुणाचं नाव आहे.
शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री असताना दिल्लीतील एनडीएमसी सेंटरमध्ये एका कार्यक्रमात अरविंदरने शरद पवारांवर अचानक हल्ला केला होता. हल्ला केल्यानंतर अरविंदर फरार झाला होता
दिल्ली न्यायालयाने 2014 मध्ये त्याला गुन्हेगार घोषित केलं होतं. त्यानंतर आता अरविंदरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, दिल्लीत ट्रान्सपोर्टर म्हणून काम करणाऱ्या अरविंदर सिंगने आपण महागाईमुळे आणि भ्रष्टाचाराने वैतागलो आहे आणि योजना करून कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर हल्ला करायला आलो होतो असं सांगितलं होतं.
Delhi: Arvinder Singh (also known as Harvinder Singh), who had slapped NCP Chief Sharad Pawar in 2011, and was absconding since then, has been arrested by the police. He was declared a Proclaimed Offender by a Delhi Court in 2014. pic.twitter.com/4tEs7tphPq
— ANI (@ANI) November 13, 2019