“भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही”

0
185

मुंबई : भाजपसोबत जाण्याच्या प्रश्नच उद्भवत नाही राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासोबत हात मिळवणी करत महाराष्ट्र सरकार स्थापन करण्याचे एकमताने ठरविले आहे, असं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

अजित पवार यांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे आणि खोडसाळ असून समाजात चुकीचा समज पसरविणारे आहे, असंही पवार म्हणाले आहेत.

आम्ही शरद पवार यांच्यासोबत आहोत आणि कायम बरोबर राहणार. अजित पवार कोणत्या राष्ट्रवादीमध्ये आहेत हे पाहावं लागेल, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

दरम्यान, अजित पवारांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूंकप झाला. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीत फूट फडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here