Home देश “बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना कोरोनाची लागण”

“बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना कोरोनाची लागण”

पाटणा : बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांना कोरोनाची लागण झाली आहे. मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत ही माहिती दिली आहे.

कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, कोणतीही अडचण नाही. मागील दोन दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवत होती. सध्या पाटणामधील एम्स रुग्णालयात दाखल झालो असून सीटीस्कॅन रिपोर्ट नॉर्मल आला आहे, असं ट्विट करत सुशीलकुमार मोदी यांनी ही माहिती दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अहो जनाची नाही तरी मनाची बाळगा; दसरा मेळाव्यावरून अतुल भातखळकरांची शिवसेनेवर टीका

भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातील नागरिकांना मोफत कोरोना लस नाही का?- प्रियांका चतुर्वेदी

उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लक्षणं; होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय

अजित पवारांसोबत पहाटे शपथविधी ही नैतिकता, आणि…- एकनाथ खडसे