Home महाराष्ट्र अजित पवारांसोबत पहाटे शपथविधी ही नैतिकता, आणि…- एकनाथ खडसे

अजित पवारांसोबत पहाटे शपथविधी ही नैतिकता, आणि…- एकनाथ खडसे

जळगाव : अजित पवार यांच्यासोबत पहाटे पाच वाजता शपथ घेता, ही नैतिकता आणि मी राष्ट्रवादीत गेलो तर ही अनैतिकता का? असा सवाल एकनाथ खडसेंनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधताना ते बोलत होते.

पक्षाचा निर्णय सामूहिक आहे, असं समजून मी 40 वर्ष पक्षाच्या आदेशाचं पालन करत आलो. देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेण्याचं कारण म्हणजे ते नेते होते, मुख्यमंत्री होते, दुसऱ्यांना क्लीन चिट दिली, तशी मलाही देता आली असती, असं एकनाथ खडसे म्हणाले.

विनयभंगाचा गुन्हा दाखल करताना ते सांगू शकले असते की चुकीचं काम करु नका, पण त्यांनी परवानगी दिली. मला सांगितलं काळजी करु नका, तीन महिन्यात मंत्रिमंडळात परत घेऊ. आपण विश्वास ठेवायचा, नि विश्वासघात करायचा असं अनेकदा व्हायचं” असंही एकनाथ खडसेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी-

“पंकजा मुंडे जर शिवसेनेत आल्या तर त्याचा आम्हाला आनंद आहे”

भाजपमधील सामूहिक नेतृत्त्व संपलंय, आता एकाधिकारशाहीने निर्णय घेतले जातात- एकनाथ खडसे

राॅयल चैलेंजर्स बेंगलोरची विजयी दाैड कायम; कोलकाता नाईट रायडर्सवर 8 विकेट्सनी मात

“एकनाथ खडसे निष्ठावंत नाहीत, त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देणार”