सांगली : महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसानंतर राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंच. पण या गावातील शुभम जाधव हा 22 वर्षाचा तरुण अतिवृष्टीमुळे पाण्यात वाहून गेला. त्यामुळे जाधव यांच्या कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळलाय.
पाहणी करण्यासाठी भाजप नेते प्रविण दरेकर सांगलीत आले होते. सांगली जिल्ह्याच्या तडवळे गावाला दरेकरांनी भेट दिली. यावेळी एका आईचा हंबरडा ऐकून प्रविण दरेकरांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी आज शुभमच्या कुटूंबियांचं सांत्वन केलं. आपलं दु:ख दरेकर यांच्याकडे मांडताना शुभमच्या आईने हंबरडा फोडला.
सांगली जिल्ह्यातील तडवळे गावातील तरूण शुभम जाधव अतिवृष्टीमुळे पाण्यात वाहून गेला, दौऱ्यात मी कुटूंबियांचे घरी जाऊन सांत्वन केले. यावेळी कुटूंबाचे दु:ख ऐकताना मलाही अश्रु अनावर झाले, अतिवृष्टीतील अशा प्रत्येक कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नाही. pic.twitter.com/OTuBrTby4T
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) October 21, 2020
महत्वाच्या घडामोडी-
नाथाभाऊंच्या प्रवेशाने महाविकास आघाडीची ताकद वाढेल- गुलाबराव पाटील
पक्ष सोडताना कुणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं, खडसेंनी मला व्हिलन ठरवलं- देवेंद्र फडणवीस
एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…