मुंबई : भाजपचे जेष्ठ्य नेते एकनाथ खडसे यांचं राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत अधिकृत घोषणा केली. भाजपसाठी हा मोठा भूकंप मानसा जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकेकाळी मित्रपक्ष असलेल्या भाजपाला मोलाचा सल्ला दिला आहे.
“यशाची शिखरं पादाक्रांत करताना पायाखालचे दगड का निसटतायतं याकडे लक्ष्य द्या, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला आहे आहे.
एकनाथ खडसे महाविकास आघाडीत येत आहेत त्यामुळे त्यांचं स्वागत आहे. त्यांच्याबद्दल मी जास्त काही बोलण्याची गरज नाही, कारण त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. ते स्पष्ट वक्ते आणि लढवय्ये आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
खडसेंसारखा पाळंमुळं रुजवणारा माणूस ज्यावेळी पक्ष सोडतो तेव्हा मला असं वाटतं भाजपानं याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे. यशाची शिखरं पादाक्रांत करताना पायाखालचे दगड का निसटत आहेत याकडे त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…
कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका परवडत नसेल तर लसूण, मुळा खा- बच्चू कडू
चिल्लर… थिल्लर गोष्टींकडे बघायला मला वेळ नाही; फडणवीसांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
आम्ही सगळेच आशावादी होतो की…; खडसेंच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया