Home महाराष्ट्र कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका परवडत नसेल तर लसूण, मुळा खा-...

कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका परवडत नसेल तर लसूण, मुळा खा- बच्चू कडू

अमरावती : राज्यात आणि देशात ठिकठिकाणी झालेल्या अतिवृष्टीनं पिकांचं मोठं नुकसान झालं असून, याचा फटका कांद्याच्या पिकालाही बसला आहे. अशातच राज्याचे मंत्री बच्चू कडू यांनी कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका. जर परवडत नसेल तर लसूण आणि मुळा खा, असं वक्तव्य केलं आहे. ते अमरावतीत बोलत होते.

केंद्र सरकारनं इराणमधून नुकताच कांदा आयात केल्यानं संपूर्ण देशासह राज्यात कांद्याच्या किंमती भाव मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र, कांद्याचे भाव वाढले म्हणून सर्वसामान्य माणसानं बोंबलू नये, असं बच्चु कडू यांनी म्हटलं आहे. तसेच ज्यांना कांदा परवडत नसेल त्यांनी मुळा, लसूण खावा, असंही विधान बच्चु कडू यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

चिल्लर… थिल्लर गोष्टींकडे बघायला मला वेळ नाही; फडणवीसांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

आम्ही सगळेच आशावादी होतो की…; खडसेंच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

ज्या पक्षाने छळलं त्याच पक्षात नाथाभाऊंनी जाणं हे दुर्दैवी- रावसाहेब दानवे

ओहोटी संपली आता भरती येणार, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर रोहित पवारांची प्रतिक्रिया