विश्रांतीचा सल्ला असूनही बीग बी करतात 18 तास काम

0
191

मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे आणि काम न करण्याचाही सल्ला दिला आहे. पण डॉक्टरचं ऐकतील तर ते अमिताभ कसले!

अलीकडेच त्यांनी त्यांच्या ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं की ते एका दिवसात 18 तासांची शिफ्ट करत आहेत. त्यांनी आपल्या प्रसिद्ध टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या तीन एपिसोडचं शूटिंग एकाच दिवसात केलं होतं.

मी काम करतो. मी दररोज काम करतो. मी कालही काम केलं होतं, जे 18 तासांनंतर पूर्ण झालं. यामुळे मला प्रेम आणि आशीर्वाद मिळतात, असं अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहलं आहे.

दरम्यान, तब्येत खराब असल्यामुळे बीग बी 25 व्या कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊ शकले नव्हते. या फेस्टिव्हलमध्ये अमिताभ गेली सहा वर्षे सातत्याने सहभागी होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here