नवी दिल्ली : देशातून लॉकडाऊन गेला असला तरी व्हायरस गेलेला नाही. कोरोनाचं संकट कायम आहे. अजूनही सतर्कता बाळगा, असं सांगत जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. ते देशवासियांना संबोधित करत होते.
सणांच्या या हंगामात बाजारपेठेतही पुन्हा एकदा गर्दी दिसत आहे. लॉकडाऊन गेला असला तरी अद्यापही कोरोना व्हायरस गेलेला नाही. गेल्या 7 ते 8 महिन्यांत देशातील प्रत्येक नागरिकानं भारताची परिस्थिती बिघडू न देण्यासाठी प्रयत्न केले आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
वेळोवेळी साबणाने हात धुवा आणि मास्क वापरा, असा सल्लाही पंतप्रधानांनी दिला आहे. देशात कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर चांगला आहे. आज देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण चांगलं आहे. मृत्यूचे प्रमाण कमी आहे. जगातील संपन्न देशांपेक्षा जास्तीत जास्त नागरिकांचे प्राण वाचविण्यात भारत यशस्वी होत आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ; प्रविण दरेकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
अभिनेत्री कंगणा रणाैतला बलात्काराची धमकी
प्रत्येक वेळी केंद्र केंद्र करायचं नसतं; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला