पुणे : केंद्र सरकारकडे मदत मागितल्यास बिघडतं कुठे?, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यावर प्रत्युत्तर देत प्रत्येक वेळी केंद्र केंद्र करायचं नसतं, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
मुख्यमंत्री हे निर्णय घेऊ शकतात. त्यांनी धावता प्रवास करण्याची गरज नाही. कोरड्या प्रवासातून काहीही निष्पन्न होणार नाही. त्यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचा निर्णय घ्यावा. पंचनामे करण्याचीही गरज नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
प्रत्येक वेळी केंद्र केंद्र करायचं नसतं. आपत्तीच्या वेळी पहिली मदत राज्य सरकारने करायची असते. नंतर केंद्राकडे मदत मागायची असते. राज्य सरकारने आधी मदत घोषित करावी, केंद्रकडून जे मिळेल ते बोनस समजायचं, असही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
केंद्र सरकार निश्चित मदत करेल, पण…; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
जोस बटलर-स्टिव्ह स्मिथची मॅच विनिंग पार्टनरशिप; राजस्थानचा चेन्नईवर 7 विकेट्सनी विजय
“मुंबई उच्च न्यायालयाचा अर्णव गोस्वामींना दणका”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थिल्लरबाजी करु नये; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा