Home महाराष्ट्र मदत मागितली बिघडलं कुठं?; केंद्र सरकार हे परदेशातील सरकार नाही; उद्धव ठाकरेंचा...

मदत मागितली बिघडलं कुठं?; केंद्र सरकार हे परदेशातील सरकार नाही; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

सोलापूर : राज्यात अतिवृष्टी आली असताना राज्य सरकारने केंद्राकडे मदत मागितली तर बिघडलं कुठं?. केंद्रातील सरकार हे देशाचं सरकार आहे. परदेशातील सरकार नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

केंद्र सरकार हे परदेशातील सरकार नाही. ते देशाचं सरकार आहे. विरोधक केवळ पक्षाचा विचार करत असतील. देशाचं सरकार आहे. त्यांनी पक्षपात न करता मदत करणं अवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही फोन करुन मदतीचं आश्वसन दिलं आहे. त्यामुळे त्यांना त्याची जाणीव आहे. राजकारणाचा चिखल कुणी एकमेकांवर उडवू नये, उद्धव ठाकरे म्हणाले.

केंद्र काय करणार आणि राज्य काय करणार यापेक्षा राज्याला केंद्राच्या मदतीची गरज असेल तर सर्वांनी एकत्र येऊन ही मागणी मागितली पाहिजे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, आजच मला परिस्थिती कळली असं नाही. पावसाला सुरुवात झाल्यापासून यंत्रणेच्या संपर्कात आहे. नुकसान किती होतंय, पाऊस किती पडतोय याची माहिती सातत्याने घेत होतो. उद्या परवाही मी येणार आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी  सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी-

सरकारच्या नाकर्तेपणामुळे पवार साहेबांना मुख्यमंत्र्यांचा बचाव करावा लागतोय- देवेंद्र फडणवीस

‘हे शेतकऱ्यांचं सरकार, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही’; मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना ग्वाही

खडसेंची भाजपने दखल घेतली नाही, पण…; खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चेवर शरद पवारांची प्रतिक्रिया

सत्तेत असताना भाजपला मदरसे बंद करावेसे वाटले नाहीत का?; इम्तियाज जलीलांचा सवाल