बारामती : सरकारच्या नाकर्तेपणामुळे शरद पवार यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बचाव करावा लागत आहे, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
सध्या शरद पवार यांना दररोज सरकारचा बचाव करावा लागतोय. कारण, या सरकारचा नाकर्तेपणा उघड झालाय. अतिवृष्टीनंतर अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री मुंबईतच बसून होते. आमचे दौरे जाहीर झाल्यानंतर हे सर्व पालकमंत्री मुंबईवरून आपापल्या मतदारसंघात परतले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, आम्हीच मुख्यमंत्र्यांना मुंबईत थांबायला सांगितलं आहे. कोरोना संकटाच्या काळात आम्हीच मुख्यमंत्र्यांना तुम्ही एका ठिकाणी बसा, आम्ही सर्वजण फिरु, अशी विनंतीही केली होती. ज्यांच्या हातात प्रशासनाची जबाबदारी असते त्यांना अनेक निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय घेण्यासाठी त्यांना कार्यालयात थांबावं लागतं. माझ्या हातात प्रशासकीय जबाबदारी नाही, त्यामुळे मी फिरत असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं होतं.
महत्वाच्या घडामोडी-
‘हे शेतकऱ्यांचं सरकार, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही’; मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना ग्वाही
खडसेंची भाजपने दखल घेतली नाही, पण…; खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चेवर शरद पवारांची प्रतिक्रिया
सत्तेत असताना भाजपला मदरसे बंद करावेसे वाटले नाहीत का?; इम्तियाज जलीलांचा सवाल
हुश्श…जिंकलो! दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबचा विजय