मुंबई : मुंबईच्या अनेक भागातील महिलांना नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लोकल प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असताना रेल्वेकडून मात्र आता वेळकाढूपणा केला जात आहे. यावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुंबईच्या महिलांना उत्तर द्यावं, असं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
मंदिरे उघडा म्हणून बोंब ठोकणाऱ्या भाजपाला नवरात्रोत्सवात आपल्या दुर्गाशक्ती माय भगिनींकरिता लोकल चालू होईल याची चिंता नाही का? मुंबई भागातील महिलांच्या लोकल प्रवासाठी भाजपचा आवाज बंद का? आता ते घंटानाद का करत नाहीत? असे सवाल करत सचिन सावंत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, नवरात्रीत मायभगिनींना लाभ झाला नसता का? असा सवालही सचिन सावंत यांनी यावेळी केला. 17 तारखेपासून हा प्रवास महिलांना करता येणार होता व त्याच दिवसापासून नवरात्र सुरू होणार हे माहित असताना रेल्वेबोर्डाची परवानगी आधीच का घेतली नाही? याचं उत्तर पियुष गोयल यांनी मुंबईच्या महिलांना दिले पाहिजे, असंही सचिन सावंत म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याच्या चर्चेवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…
“सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा विजय”
“शरद पवारांच्या त्या सभेने सिद्ध केलं ‘महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही”
साहेब, प्रचंड कष्ट आणि लोकांचं प्रेम या तीन गोष्टी कधीही वेगळ्या करता येणार नाहीत- रोहित पवार